Friday, August 31, 2018

देव दर्शन



डोळे भरून तुला पहाण्यासाठी आतूर झालो होतो मी.
तुझ्या दर्शनाची लागली होती आस
हार, नारळ, पेढे घेऊन
रांगेत उभा राहिलो तासन् तास.

गाभाऱ्या पर्यंत पोहोचताना जीव मेटाकुटीस आला
भाविकांच्या गर्दीत गुदमरला माझा श्वास
या पुढे घरूनच हात जोडेन तुला देवा
इथे येण्याचा करणार नाही अट्टाहास.

हल्ली मुक्या जनावरांच्या अंगावरून मी मायेने हात फिरवतो
आणि छोट्या अनाथ मुलांना प्रेमाने भरवतो घास.
आश्रमात जाऊन व्रुद्धांची खुशाली विचारतो मी
कारण या सर्वांमध्ये मला लाभतो तुझा सहवास.
जेंव्हा डोळे भरून तुला पहाण्यासाठी आतूर होतो मी
आणि तुझ्या दर्शनाची लागते मला आस.

तुझ्यामुळे बहरतात हिरवीगार झाडे, लता आणि वेली
फुलपाखरांत तूच उधळतोस रंग आणि फुलांमधे सुवास
तूच तर या जगाचा निर्माता
मग नद्या, डोंगर, जंगलांमधे नसेल का तुझा वास?
जिच्या कणाकणात तुझे अस्तित्व
अशा धरती मातेचा होऊन देणार नाही र्हास
मी निसर्गाच्या सानिध्यात रमतो
जेंव्हा तुझ्या दर्शनाची लागते मला आस.

आई वडील आणि गरूंना तुझ्या स्थानी पहातो
त्यांच्या सेवेची कधीच सोडणार नाही कास
जेंव्हा तुला पहाण्यासाठी आतूर होतो मी
आणि तुझ्या दर्शनाची लागते मला आस
फक्त डोळे मिटून तुला नमन करतो
कारण माझ्या ह्रदयात तुझीच जागा खास.


5 comments:

  1. मस्त। देव आपल्यातच आहे, हे सत्य आपण विसरतो।खूप छानरीत्या मांडलय।

    ReplyDelete
  2. Thanks! Good to know that you feel the same.

    ReplyDelete
  3. Devala jikde ahat tikdun manapasun namaskaar kelat tari pochto. He is everywhere. . Very well said Abhi

    ReplyDelete
  4. Tejashree ShringarpureSeptember 1, 2018 at 10:54 PM

    Very nice!

    ReplyDelete
  5. शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
    हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी....

    ReplyDelete